1) राज्यातील सर्व ग्रामसेवकांना प्रशासकीय मार्गदर्शन करणे.
2) सभासदाचा अपघाती किंवा आकस्मिक मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत करणे
3) दैनंदिन कामकाजाचा विषयावर कार्यशाळा आयोजन करणे
4) ग्रामपंचायत अभिलेखे पूर्ण करण्याबाबत प्रशिक्षण व कार्यशाळा आयोजन करणे
5) शासन निर्णयाचे संकलन वाचन साहित्य तयार करणे
6) सभासदांना विभागीय पातळीवर पुरस्कार देऊन सन्मानित करणे
7) वेबसाईट व मोबाईल ॲप ची निर्मिती करून सभासदांना दैनंदिन कामकाजावर आधारित अद्यावत माहिती देणे
9) संगणकाचा वापर, ई-निविदा, ई ग्रामस्वराज व इतर आवश्यक विषयावर प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करणे
10) महिला ग्रामसेवकांसाठी मदत केंद्र सुरू करणे
11) सेवाविषयक बाबी, सेवा पुस्तक, रजा व वेतन, निलंबन, अपीले व इतर सर्व विषयक बाबी वरती प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करणे
12) सभासदांच्या पाल्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर आयोजीत करणे
13) सभासदारांसाठी ताण तणाव मुक्त कार्यशाळेचे आयोजन करणे व मानसिक आरोग्य बाबत जनजागृती करणे
14) संपूर्ण राज्यात एक समान कामाची पद्धत सुरू करणे कामी सर्व ग्रामपंचायतींना मार्गदर्शन करणे
15) विषयतज्ञ, वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शन शिबिर आयोजीत करणे
16) प्रश्नमंजुषा, चर्चासत्र, ऑनलाइन कार्यशाळा, प्रत्यक्ष प्रशिक्षण कार्यशाळा, इतर मार्गदर्शक उपक्रम राबवणे
17) सभासदांसाठी व त्यांच्या कुटुंबासाठी मेडिक्लेम व विमा बाबत मार्गदर्शन शिबिर आयोजित करणे
18) आदर्श गाव, आदर्श ग्रामसेवक, आदर्श ग्रामपंचायत कामकाज या विषयाबाबत प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करणे
19) सभासदांच्या हिताचे सामाजिक उपक्रम राबविणे
20) सभासदांच्या हिताचा व सूचनांचा विचार करून कार्यकारिणीने वेळोवेळी सभेमध्ये व कार्यकारणी मध्ये सुचवलेल्या विषयांचा उद्देशांमध्ये समावेश करण्यात येईल